Posts

Showing posts with the label ज्योतिष

माझा पॉडकास्ट इंटरव्ह्यु

Image
 पोस्ट क्रमांक ००२  नुकताच सत्य वेध माध्यम समूहाच्या यूट्यूब चॅनेल वर त्यांच्या पॉडकास्ट मध्ये माझा इंटरव्ह्यु श्री राहुल कुलकर्णी यांनी घेतला.  इंटरव्ह्यु पहा आणि नक्की मला कॉमेंट किंवा मेल करून आपला अभिप्राय कळवा 

मराठी ब्लॉग का?

 अजून एक मराठी ब्लॉग? पोस्ट क्र. ००१  ज्योतिष हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. मी अभ्यासही करतो, पत्रिका अभ्यासतो, त्यावर लेखन मनन चिंतन, सोशल मीडियावर पोस्ट टाकणं हे सगळं चालू असतं.  वैदिक ज्योतिषाची व्याप्ती इतकी आहे की नुसतं मराठीमध्ये त्यावर सगळी पुस्तके वाचायला मिळावीत हे असं फार कमी आहे व. दा. भटांची आणि काही ठराविक लेखकांची पुस्तके सोडली तर मराठी मधलं ज्योतिष वाङ्गमय हे तसं अजून तितके समृद्ध नाही. आता हिंदीमध्ये आणि इंग्लिश मध्ये खूप लिखाण वैदिक ज्योतिषावर झालेले आहे बी व्ही रमण यांच्यासारखे दक्षिणात्य ज्योतिषकार यांनी आपलं संपूर्ण लेखन इंग्लिश मध्ये केलेलं आहे. हे सगळं विविध भाषेतील लिखाण तसेच जुने संस्कृत संदर्भ ग्रंथ आणि त्यांची हिंदी भाषांतरे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली की ज्योतिष हा विषय खूप गंभीर सुरामध्ये लिहिलेला आहे. तसे पाहता ज्योतिष ही हलक्यात घ्यायची गोष्ट नाहीच परंतु लिखाण सुद्धा धीर गंभीर असलं पाहिजे असं कुठे आहे? गंभीर विषय सुद्धा हलक्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावता येऊ शकतो. सोप्या भाषेत विचारही करता येतो. जड जड विद्वत्ताप्रचूर शब्दांनी ज्योतिषीय ग्...